("हं... तुला माझ्या विषयी काय वाटतं?" या precious प्रश्नाला कधीकधीच तोंड फ़ोडायचं असा अलिखित नियम ठरल्यामुळे, मी corollary प्रश्न विचारला.)
तो: "काही विशेष वाटत नाही, म्हणजे आता काय सांगायचं? त्याच्याशी बरेच दिवस काहीच contact नाही, पुर्वीही खूप होता असं नाही,
त्यामुळे ठीकच मुलगा आहे असा म्हणेन. बरं त्यानी आधीही काही विशेष केलं नव्हतं ज्याच्यावरुन एखादं मत तयार व्हावं, म्हणजे तसं काहीच मत नाही, तो फ़क्त होता आणि मग नव्हता, म्हणुन काहीच सांगता नाही येणार."
(२ शब्दांच्या उत्तरासाठी हा एव्ह्ढा बोलु शकतो, In fact जास्तंच बोलु शकतो, पण मी पुढे काहीतरी बोलेन, ज्यावर त्याला अजुनच जास्त बोलता येइल, अशी शक्यता आहे, असं त्याला वाटलं, म्हणुन त्यानी pause घेतला...:D...)
मी: "अरे म्हणजे त्याला कला या विशेष कला प्रकाराविषयी काहीतरी विशेष वाटायचं, असं मला वाटायचं, म्हणुन त्या angle मधून विचारलं"
तो: "कला या प्रकारासाठी basically एक किडा लागतो तुमच्यात, जो तुम्हाला काहीतरी करायला भाग पाडतो, त्याच्याकडे हा किडा नव्हता"
मी: "पण मला वाटतं talent असेल तर that should suffice"
तो: "नाही नाही, किडा या प्रकाराचा आणि objective reasoning चा तसा काहीच संबंध नाही बघ...तुम्हाला ते करावसं वाटतं passionately, म्हणजे नाही केलं तर तुम्ही भयंकर अस्वस्थ होता, practically काही बिघडणार नसतं पण परत practicality चा काही संबंधच नाही
येत...basically kida is bigger than you are, kida rules"
मी: "ए आपण प्रेम या विशेष कला प्रकारा बद्दल ही असचं म्हणतो, प्रेमापुढे logic, reasoning नसतं, मग किडा == प्रेम का?"
तो:"हो, किडा हे एक प्रकारचं प्रेमच आहे, म्हणजे बघ ना, आपल्याला नाटक करावसं वाटतं, मग आपण काहीही feasibility चा विचार न करता, रात्र रात्र जागुन, college, company बुडवुन, भलभलत्या देशातुन पळून येऊन ते करतोच ना? हे असं illogically प्रेमातच करतात"
मी: "okk, म्हणजे किडा असेल तर "माझं पुढे काय होईल?" हा प्रश्न ही नाही पडत"
तो: "in fact या बाबतीत किडा is different from प्रेम, प्रेमात तुमची एकट्याचीच लढाइ असते, किडा collective असतो, काय होईल हा विचार नसतोच because u feel stronger by the number"
मी: "this almost sounds like mass hysteria :D "
तो: "kida IS a kind of mass hysteria"
मी: "OKKK मग प्रेम म्हणजे individual hysteria !"
तो: "अगं बाळ पण तुझा प्रश्न, "किडा म्हणजे काय" हा असुन, "प्रेम म्हणजे काय" हा नव्ह्ता"
मी: "चूक, माझ प्रश्न, तुला अखिलेश विषयी काय वाटतं, हा होता :D"
तो: "चूक, तुझा प्रश्न, तू आता अर्धा तास radio होशील का, असा होता"
मी: " heehaahaa समेवर"