तो: मी त्याला विचारलं, "तू आणि स्म्रुति लग्न का नाही करत?"
मी: मग तो काय म्हणाला?
तो: तो विकट हसला.
मी: छ्या, विकट, बिकट हसण्याला काही अर्थ नाही, ते फ़क्त एक
tool आहे, मी भारी आहे अस दुसर्याला वाटवून देण्यासाठी.
तो: hehe शक्य आहे.
मी: अशी य tools आहेत, जी आपणही वापरतो रोजच.
तो: हो, like सगळ्याच बाबतित आपण
equally careless आहोत असे भासवणे...
मी: म्हणजे जेवणात आमरस आहे अशी हवा आधी निर्माण करुन शिकरण आलं तरी काही फ़रक पडत नाही असे दाखवणे.
तो: बरोबर, खरी टेस्ट जर, शिकरण ही न येता कारल्याची भाजी आली तर होवू शकेल :D
तो: hehe किंवा हे ऐक, कुणी काहि प्रश्न विचारला की मंद स्मित करुन "ते तुला आत्ता नाही कळणार " असं patronizing tone मधे म्हणने.
मी: haha हो, समोरचा आपल्याच वयाचा किंवा आपल्यापेक्शा मोठा असेल तर हे वाक्य फ़ारच effective होतं.
तो: किंवा, heated discussion च्या मधेच भलतेच मुद्दे, तेच मुद्दे मुळ असुन बाकी सगळा tp आहे असा आव आणुन मांडणे.
मी: उदाहरणार्थ...?
तो: हं मंदार चं उदाहरण घे, say बंड्या आणि रंगी जोर जोरात भांडताहेत say...coffee चांगली की चहा यावरुन, it goes like this…
बंड्या : (आवेषात) मी सांगतो pl मधे रात्री टम्पास भरुन प्यायलेल्या चहा मुळे माझा engg graphics चा विषय सुटला आणि...
मंदार : coffee किंवा चहा आपली basic survival need नाहीच. (pause आणि शून्यात नज़र.... )
बंड्या: (याला ignore करुन पुढे) आणि नुस्तं crisis च्या वेळेलाच नाहीतर njoyment साठी सुद्धा, ते भरत समोरचं अम्रुततुल्य, तिथला बारा बारा कप प्यायलेला चहा, अहहहा सुख सुख म्हण्तात ते हेच.
रंगी: छे coffee जास्त सही, coffe ला एक भारी status आहे :D, सगळीकडे coffee shops आली आहेत, tea shop मात्र दिसत नाही, आता बोल!
बंड्या: छ्या, त्यानी काय होणार...मी म्हणतो..
अंदार: status वरुन गोष्ट चांगली कि वाईट हे ठरणार कि quality वरुन status? मला वाटतं हे लोकांचं नेहमीचच confusion आहे. theoretical level ला solution सापडतं पण ते convinience साठी नाकारुन, practicalityच्या चौकटीत अडकतात पण स्वतःला free असल्याचं भसवतात. याच्यापेक्शा metaphysical level ला confused असणंच चांगलं...( ०.००१ मधे बघतो)
बंड्या आणि रंगी: (अवाक, ही बडबड ऐकून याला ignore करण्याइतकीही शुद्ध मेन्दूत उरत नाही)
मंदार: (बंड्या आणि रंगी ला ignore करुन) statistically majority लोकांचा हाच गोंधळ उडतो म्हणजे योग्य गोष्ट (म्हणजे त्यांना conventionally योग्य वाटणारी) केली तर ते system च्या चौकटीत बसतात पण त्यांना चौकटीच्या बाहेर विचार करता येत नसल्यामुळे आपण चौकटीत आहोत कि नाही हेच कळत नाही, in fact ती चौकट गोल तर नाही ना असाही प्रश्न पडतो..(आता ०.७ )
रंगी: पण coffeee...
मंदार: हो coffee चालेल, तेही एक metaphorच आहे म्हणा, relaxationचं illusion वाटावं म्हणुन confused माणसांनी निर्माण केलेलं.
बंड्या: (triumphantly) पण चहाचं असं नाही, तो individual आहे.
मंदार: individual कळायला तुला आधी collective कळावं लागेल.
बंड्या, रंगी: (चाचरत) collective कुठून आलं यात...?
मंदार: (विकट हसतो) (उठतो आणी बरोबर १.२३ मधल्या जब्रेश्वर अम्रुततुल्यात ४ कप चहा ढोसून येतो)
तो: आता सांग, हे काय होतं?
मी: Douglas Adams says "There's a theory which states that if at any time anyone discovers exactly what the Universe is for and why it is here, it will instantly disappear and be replaced by something even more bizarre and inexplicable."
तो: आता याचा काय अर्थ? मला इन्ग्रजी बिल्कुल कळत नाही हे तुला महितेय.
मी: (मंद स्मित) ते तुला कळेल योग्य वेळ आली कि (विकट विकट हास्य)
तो: ##$%^
Diagnostics of boredom
मी: मला खूप कंटाळा आलाय :(
तो: का? काय झालं?
मी: अरे routine routine खेळून bore झालंय.
तो: बरं, मग काहीतरी वेगळं कर, bungee jumping कर, किंवा जपानी संस्क्रुतीत चहाचे महत्व, या विषयावर प्रबन्ध लिही hehe.
मी: thank u dude, तुझ्याकडून अशाच हिडीस suggestions ची अपेक्शा होती. पण मला सांग वेगळं करण्याचंच जर routine झालं तर?
तो: म्हणजे काय बुआ? दर वेळी जपानी संस्क्रुतीत चहाचे महत्व याच विषयावर तु प्रबन्ध का लिहिशील? may be मग पुणेरी संस्क्रुतीमधे चितळेंच्या बाकरवड्यांचे महत्व यावर तु लिहिशील ना?
मी: गप रे, दर वेळी वेगळं वेगळं करायला लागले आणि नंतर लक्शात आलं कि त्याचाही एक pattern झालाय म्हणजे routine झालाय, तर bore होईल असं वाटतयं.
तो: काय सांगतेस? तुला बाकरवड्या आवडत नाहीत??? hehhee , listen child, जे तु करायचं ठरवशील ते तुला आवडतं म्हणुनच तु करत असशील नं? मग bore का होईल?
मी: तसं नाही रे, i will still b njoying what i will b doing, पण routine झालं कि bore होतं, म्हणजे सारखा change हवासा वाटतो. आता change म्हणुन काहीतरी वेगळं , म्हणजे bungee jumping सुरू केलं, njoyed it for a while, मग त्याचं routine झालं म्हणुन मग जपानी संस्क्रुतीत चहाचे महत्व hehe या विषयावर research केला, तेही bore झालं मग नवीन काहितरी, हे एक pattern झालं तर bore होईल.
तो: हं म्हणजे no sense of progress.
मी: bingo!!! in fact सारखं bore होतंय असा विचार करुन ही bore होतंय :D recursion झालं हे hehe
तो: हं nothing to be worried about, असं होउ शकतं, we r changing with time, we can start liking different things, our tastes may change with time.
मी: पण मग काय, सारखं सारखं इकडे तिकडे भटकंतीच करत बसायची का आयुष्यभर? searcing searching?
तो: ते एका द्रुष्टीने बरं आहे, reaching reaching झालं तर पुढे काय असा परत प्रश्न प्रश्न पडेल.
मी: हं, पण मग करायचं काय?
तो: searching searching च, in the hopes कि काहितरी long lasting सापडेल. but here we are not talking of finding something to do per say. we r trying to find out why do we do something in the first place? ते कळलं कि finally काय हवंय हे कळेल आणि मग u will do things to reach there and then there will be a sense of progress.
मी: हंsssss आयुष्यात serious झालं पाहीजे तर!! :D
तो: try कर, तुला लय अवघड आहे पण ते...
मी: काsssss?
तो: कारण तु आळशी आहेस.
मी: अरे पण मला seriously bore झालयं :(
तो: doesn't matter, तुझ्या आळशीपणामुळे तुला bore व्हायचेही कष्ट घेववणार नाहीत hhaaahhaa
मी: तु मुर्तिमंत useless आहेस, uselessness personified #$%^&*
Cause and Effect

"Occurrences in the universe are bound by the laws of Cause and Effect" असं मी कुठल्यतरी sci-fi पुस्तकात वाचलं.
मी गेल्या आठवड्यात एक नवीन चित्रं काढलं. हा effect धरला तर Cause will undoubtedly be...
तो: तू focussed नाहीएस.
मी: हाड्तुड मी व्यवस्थीत focussed आहे plus मझ्याकडे किडा पण आहे.
तो: असेल, पण तो focussed किडा नाहिये, त्याला आपण तिरळा किडा म्हणू शकतो फ़ारतर.
मी: eeeeks उगाच भलतेसलते आरोप?
तो: मग? जरा इकडेतिकडे काही खुट्ट झाले की गेला तुझा focus, मग तू काहीच करत नाहीस, फ़क्त गोट्या मग...
मी: तुझं perception गंडतंय, मी तुझ्याइतकी disciplined नाहीये but that doesn't mean मी काहीच करत नाही..
तो: prove it !!!
मग जरा चिडून वगॆरे मी हे चित्रं काढलं...
Unfortunately या Effect चा मग Cause झाला आणी तो ते चित्रं घेऊन निघुन गेला :(
Subscribe to:
Posts (Atom)