तो: काय मग कामगार मंडळींचं appraisal झालं की नाही? पगार वाढला का?
मी: नाही अजून..म्हणजे लोकांनी मझ्याबद्दलची मतं नोंदवली आहेत आणि मी त्यांच्याबद्दलची, पण अजून rating नाही कळलं.
तो: किती पगार वाढेल असं वाटतंय?
मी: कोणास ठाऊक! हे सगळं फारच perception based आहे. कधी कधी वाटतं आपली परीक्षांची पद्धत जास्त चांगली होती, जितकी बरोबर उत्तरं तितके मार्कं.
तो: हं कदाचित...
मी: पण मजा माहितेय? कितीही चांगला पेपर लिहिला आणि अंदाज असला की चांगले मार्कं मिळणार आहेत, तरीही जेव्हा मार्क finally कळण्याची वेळ यायची तेव्हा tension यायचंच...conversely वाईट पेपर लिहिला आणि माहित असलं की या वेळी काही खरं नाही तरीही tension ठरलेलंच!
तो: हाहा म्हणजे चांगल्या पेपर मधे कमी मार्कं मिळतायत का आणि वाईट पेपर मधे चुकुन जास्त मार्कं मिळतायत की काय ही anxiety!
मी: हो आणि हे असं फक्त मार्कांच्या बाबतीतच होतं असं काही नाही..म्हणजे बजेट ऐकताना, महिन्याच्या पगाराची स्लीप बघतानाही असं होतं.
तो: थोडक्यात काय तर ज्या गोष्टींच्या evaluation चे आकडे matter करतात त्या सर्व ठिकाणी!
मी: हो आणि result काय असेल याचा अंदाज असला तरीही! कशामुळे असेल रे असं?
तो: कदाचित माणसाला असं आकड़्यांमधे describe करणंच logical नसेल! म्हणजे एखादा माणूस १००% चांगला आहे असं म्हणता येत नाही... बारीक-सारीक का होईना तो कुठेतरी वाईट वागतो किंवा इतरांना त्याचं कुठचंतरी वागणं चांगलं वाटत नाही अशा अर्थानी. म्हणजे बहुसंख्य वेळेला माणसाचं वागणं किंवा त्याचे काही characteristics जबरदस्तीने कुठच्यातरी quantification band मधे, म्हणजे मार्कांच्या, IQ च्या वगैरे बसवलं तर तो अस्वस्थ होत असणार! How does this hypothesis sound?
मी: Not bad at all! मला तर तुझीच काळजी वाटते..वजनाच्या काट्यावर उभं राहताना तुला किलो किलो चं tension येत असेल नाही? हीही!
तो: !@%#$#%
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
हे आपल्या ब्लॉग लिहील्यानंतरही aaplicable आहे. म्हणजे ब्लॉग टाकल्यानंतर किती जणांच्या comments येतील? ब्लॉग मनासारखा जमला तर कमी येतील का किंवा निदान नेहमीच्या आवडीच्या लोकांच्या comments तरी येतील का? आणि कधी कधी विचार न करता खरडून टाकले तर एकदम unknown वाचकांच्या उत्फ़ूर्त कॉमेंटस येतात. मजा म्हणजे जर feedjit वर map पाहीला तर खूप(?) जण वाचताना दिसतात . मग विचार येतो कॉमेंटस लिहायला काय घोडं मारलं जातं?
ha changla point ahe :)
Good to see you after such a long time! nice comeback :)
anand,
thanks for the warm welcome :)
Post a Comment