मी: अरे या weekend ला लई मजा आली!
तो: What sort of मजा?
मी: आम्ही चार horror movies लायनीने पाहिल्या!
तो: आरशात चार वेळा पाहण्याचं धारिष्ट्य दाखवलंस??!!! Very commendable indeed :)
मी: हो आणि पाचवा सिनेमा बघायची इच्छा झाली तेव्हा तुला भेटायचं ठरवलं :)
तो: My pleasure madame! इतके दिवस तुला मी विनोदी वाटायचो त्यापेक्षा भितीदायक जास्त respectable वाटतंय मला! पण मुळात तुला स्वत:ला घाबरवून घेण्याची हौस का निर्माण झालीये?
मी: काय माहित! Sense of adventure असेल...
तो: कदाचित माणसाच्या मनातल्या भावनेचं manifestation असेल ते...
मी: काय काय काय? जरा कळेल असं बोल की ’हे ग्रीक क्लिष्टतेच्या देवा’ !
तो: अगं मुलगी, मला असं म्हणायचंय की आपल्याला आनंद झाला की नाचावं-गावं असं वाटतं, हे झालं आनंदाचं manifestation, तसंच राग आला की आदळ-आपट करावीशी वाटते किंवा तुझ्या case मधे तू लोकांना गुद्देच घालतेस..हाहा!
मी: Useless!
तो: हाहा...तसंच भिती ही पण एक भावनाच आहे ना? instinct च आहे तो पण. भितीची आणि आपली गाठभेट तितक्या frequently होत नाही. आजकालच्या civilized lifestyle मुळे माणसाला जीवावर बेतणाऱ्या प्रसंगांना आणि तशा भितीला तोंड द्यावं लागत नाही. पण भितीलाही expression ची गरज असेल कदाचित... दु:ख, प्रेम, आनंदासारखीच...आणि म्हणून घाबरवून घेण्याचा तुझा हा अट्टहास!
मी: म्हणजे जसं दु:खात बोलून मन मोकळं होतं तसं भितिदायक सिनेमे बघून आणि पुस्तकं वाचून होत असेल?
तो: perhaps... मला नाही का तुला भेटून एकदम छान मोकळं मोकळं वाटत?
मी: @#$%$%^^%
Need of fear
Fear of quantification
तो: काय मग कामगार मंडळींचं appraisal झालं की नाही? पगार वाढला का?
मी: नाही अजून..म्हणजे लोकांनी मझ्याबद्दलची मतं नोंदवली आहेत आणि मी त्यांच्याबद्दलची, पण अजून rating नाही कळलं.
तो: किती पगार वाढेल असं वाटतंय?
मी: कोणास ठाऊक! हे सगळं फारच perception based आहे. कधी कधी वाटतं आपली परीक्षांची पद्धत जास्त चांगली होती, जितकी बरोबर उत्तरं तितके मार्कं.
तो: हं कदाचित...
मी: पण मजा माहितेय? कितीही चांगला पेपर लिहिला आणि अंदाज असला की चांगले मार्कं मिळणार आहेत, तरीही जेव्हा मार्क finally कळण्याची वेळ यायची तेव्हा tension यायचंच...conversely वाईट पेपर लिहिला आणि माहित असलं की या वेळी काही खरं नाही तरीही tension ठरलेलंच!
तो: हाहा म्हणजे चांगल्या पेपर मधे कमी मार्कं मिळतायत का आणि वाईट पेपर मधे चुकुन जास्त मार्कं मिळतायत की काय ही anxiety!
मी: हो आणि हे असं फक्त मार्कांच्या बाबतीतच होतं असं काही नाही..म्हणजे बजेट ऐकताना, महिन्याच्या पगाराची स्लीप बघतानाही असं होतं.
तो: थोडक्यात काय तर ज्या गोष्टींच्या evaluation चे आकडे matter करतात त्या सर्व ठिकाणी!
मी: हो आणि result काय असेल याचा अंदाज असला तरीही! कशामुळे असेल रे असं?
तो: कदाचित माणसाला असं आकड़्यांमधे describe करणंच logical नसेल! म्हणजे एखादा माणूस १००% चांगला आहे असं म्हणता येत नाही... बारीक-सारीक का होईना तो कुठेतरी वाईट वागतो किंवा इतरांना त्याचं कुठचंतरी वागणं चांगलं वाटत नाही अशा अर्थानी. म्हणजे बहुसंख्य वेळेला माणसाचं वागणं किंवा त्याचे काही characteristics जबरदस्तीने कुठच्यातरी quantification band मधे, म्हणजे मार्कांच्या, IQ च्या वगैरे बसवलं तर तो अस्वस्थ होत असणार! How does this hypothesis sound?
मी: Not bad at all! मला तर तुझीच काळजी वाटते..वजनाच्या काट्यावर उभं राहताना तुला किलो किलो चं tension येत असेल नाही? हीही!
तो: !@%#$#%
Mapping
मी: तू केवढा तीळकट आहेस रे! तुझ्या चेहऱ्यावर केवढे तीळ आहेत आणि डोळ्यात आणि हातावर पण!! चांदण्यांसारखे!
तो: वा! एवढी छान उपमा माझ्या हातांना पहिल्यांदाच मिळतेय! मी लहान असताना मला ते तीळ anomaly सारखेच वाटायचे, मी ते खोडरबराने खोडायचाही प्रयत्न केलाय.
मी: heeeheee तेव्हाही तू आत्ता इतकाच येडपट होतास तर..
तो: येडपट नाही उलट चौकस बुद्धीचा होतो असं म्हण..
मी: With due regards पण, खोडरबराने स्वत:लाच खोडू पाहणाऱ्या मुलाला चौकस म्हणवत नाहीये रे..
तो: अगं मी जेव्हा माझ्या हातावरचा तीळ पहिल्यांदा पाहिला तेव्हा मला काही वाटलं नाही, पण जेव्हा बाबांच्या हातावर मला तसा तीळ दिसला नाही, तेव्हा मला वाटू लागलं की माझ्या हातावरही तीळ-बिळ असायचं काही कारण नाही. असा विचार करण्याची capability असणाऱ्याला चौकस म्हटलं गेलंच पाहिजे!
मी: बर बर तू भारी चौकस-भंकस!!
तो: आणि तू एक मोठी तिरकस-तिरसट! माझ्या करंगळीवरचा तीळ बघून एका थोर भविष्यकाराने मला सांगितलंच होतं, एक वटवट करणारी काळी entity सतत माझ्या आजूबाजूला असेल!
मी: ई काहीही ridiculous.
तो: हो? तू नाहीयेस का काळी आणि वटवट करणारी?
मी: मी काळी नाहीये आणि मी वटवट करत नसून गोड बडबड करते... कोणालाही विचार. आणि basically मी तीळा वरून भविष्य सांगण्याला ridiculous म्हटलं.
तो: का? मग चेहरा पाहून, birthdate वरून, हाताच्या रेषा पाहून भविष्य सांगण्याला काय म्हणशील? Does that sound absurd too?
मी: Well, now that you put it like that, ते सगळंही absurd च वाटतंय खरं.
तो: Absurdity तर आहेच, पण ते basically mapping आहे एक.
मी: कसलं mapping? आणि कशाशी?
तो: माणसाच्या काही specific parameters चं त्याच्या भविष्याशी. माणसाचं character, हाताच्या रेषा, unique असतात ना? अगदी globally unique नसल्या तरी these can be treated as differentiating factors between people.
मी: मग? उससे क्या होगा?
तो: म्हणजे एका specific माणसाचं भविष्य शोधायचं असेल तर obvious assumption आहे की ते त्या माणसाच्याच कुठल्यातरी parameters शी related असेल.
मी: correct.
तो: म्हणून मग त्या माणसाचे एखादे parameter आपण त्याच्या भविष्याशी जोडून मोकळे होतो. For instance, हा माणूस short tempered आहे म्हणून हा high bp नी लवकर मरेल असं म्हणनं वगैरे.
मी: हो कळतंय थोडं थोडं..
तो: म्हणजे short temper -> short life म्हणजे मुळात ते त्या माणसाच्या रागीट वॄत्तिचं त्याच्या भविष्याशी केलेलं mapping आहे.
मी: आता हे एखाद्या statistical problem सारखं वाटायला लागलंय!
तो: बरोबर. आपल्याला आपल्या भविष्या विषयी वाटणाऱ्या तीव्र curiosity मधून आलेली problem solving ची methodology असावी ही. आणि त्यातून वेगळे वेगळे statistical laws बांधून काढलेली अनुमानं... अशा माणसाचं असं होऊ शकेल वगैरे..
मी: ..हो हो मी ऐकलंय की ज्या माणसाच्या डोळ्यात तीळ असतो त्याला भूतं दिसू शकतात. हे पण एक mappingचं आहे की.
तो: exactly म्हणून तर मला तू सारखी सारखी दिसत असावीस hahahhaaaa!
मी: ॒॑%॓%
Philosophy
तो: hi there! कुठे होतीस इतके दिवस?
मी: इथे-तिथे होते... अशा-तशा गोष्टी करत होते...
तो: वा छान! केवढी information दिलियेस!
मी: heeheee बरं, सांग तू काय केलंस इतक्या दिवसात?
तो: भटकंती, लुख्खेगिरी, खूप काम आणि खूप कमी बडबड!
मी: कमी बडबड? That's not your style! ... बरोबर, मी नव्हते ना... कोणाशी बोलणार होतास मग तू?
तो: अगदीच..किती बरं वाटत होतं मला.. वायफळ बडबड न करता किती तरी जास्त वेळ चांगल्या कामात घालवला मी.
मी: खडूस! एवढं काम-धाम करून तरी काय साध्य करणारेस? काम करून करून मरून जाशील एक दिवस, मग कळेल!
तो: मरून गेल्यावर काय कळणारे येडपट? जे काय कळेल ते आत्ताच कळेल ना?
मी: का? तुला नाही वाटत, मरून गेल्यावर काहीतरी भलं व्हावं तुझं म्हणून?
तो: हो वाटतं ना.. मरून मग पॅरीस च्या रस्त्यावर 7 course dinner करावा, stylish कपडे घालावेत, पोरींना पटवावं.. असं सगळं वाटतं मला..heehee
मी: आचरटच आहेस, हे तर सगळं आत्ताच करू शकशील की. म्हणजे अगदी पॅरीस नाही तरी M. G. Road ला 3 course dinner मिळेल, stylish कपडे ही तिथे रस्त्यावर मिळतील आणि पोरी तर तुला आत्ताही पटणार नाहीतच मग तुझं भयंकर भूत झाल्यावर कुठून पटायच्यात?
तो: मग काय तर! तूच हा आचरट विषय काढलास..म्हणे मेल्यानंतर काय?
मी: अरे म्हणजे तुझ्या आत्म्याचं कसं होईल असा विचार नाही करत का तू? म्हणजे बघ, परवा मी एक भजन ऐकलं, त्यात असं म्हटलं होतं की आत्ता तुम्ही जे जगताय ते तुमचं आयुष्य एक temporary state आहे, पण तुमचा आत्मा अमर आहे त्यामुळे तुम्ही असं वागलं पाहिजे की तुमच्या आत्म्याचं बरं होऊ शकेल काहीतरी.
तो: अच्छा असं झालंय का तुमचं? तरीच म्हटलं एवढं philosophical वारं का वाहू लागलंय!
मी: हल्ली मी असे विचार करायला लागले आहे, येऊन-जाऊन ६०-७० वर्षांचंच आयुष्य असतं ना आपलं? म्हणजे त्या आधी चुकून मेलो नाही तर! मग त्यानंतर काय, असा विचार येतोच.
तो: त्या नंतर काही असायला हवंच आहे का?
मी: काय माहीत, एवढा सगळा पसारा माणसांनी मांडल्यानंतर असं वाटू शकतंच ना, नंतर काहीतरी असेलंच म्हणून. नसेल तर मजा नाही काही. "मी" नावाच्या entityचं काय होईल मग?
तो: हं.. म्हणूनच ती temporary state ची philosophy आली असावी. प्रत्येक माणसाला ही भिती सतावत असेलंच, फक्त ७० वर्षं आहेत आणि त्यानंतर "the end", म्हणजे एवढी मरमर केली अयुष्यात त्याला काही अर्थंच नाही + मी मी म्हणून जी गोष्ट जगवली, विचार-मतं-materialistic गोष्टिंनी सजवली ती नाहीशी होणार! त्यातूनंच कदाचित आत्म्याची concept आली असावी, अशी एक eternal वस्तु जी unique आहे, तुमचं शरीर जे मरून जाईल (हे philosophically नाकारता येणं शक्यंच नाही म्हणून accept करावं लागलं असेल बहुतेक) त्यात temporarily राहणारी पण eternal nevertheless...
मी: म्हणजे फक्त काल्पनीक गोष्ट आहे ही? आत्मा वगैरे असं काही नसतंच?
तो: कोणास ठाउक? असेलही किंवा नसेलही, मात्र एक गोष्ट नक्की, आपल्याकडे काही वर्षं आहेत आपल्या मालकीची, त्यात आपण स्वप्नं बघु शकतो, कमाल music ऐकू शकतो, चित्रं काढू शकतो, programming करू शकतो... हे सगळं करून घ्यावं तुका म्हणे!
मी: हो हो हे चांगलंय असंच करू या!
तो: हो की नाही? but I sincerely hope की मेल्यानंतरचं आयुष्य वगैरे अशी काही गोष्ट नसावी... नाहीतर तेव्हाही येऊन तू भलते भलते प्रश्न विचारलेस तर मात्र मला आत्महत्या करण्याचा पर्यायही नसेल! heeheheee
मी: तु नेहमीच useless आहेस, अगदी eternally!!!!
Point model
तो: मग काय चालु आहे तर?
मी: generalच विशेष काही नाही, weekend ला violin चा class असतो तेव्हढंच विशेष.
तो: बाकी काय मग उरलेल्या weekend चे उद्योग?
मी: general आपलं इकडे तिकडे, public ला भेटणं, थोडी फार चित्रकला, vio ची practice नाहीतर books वगैरे.
तो: उत्तम पण याचं पुढे काय?
मी: पुढचंच तर आहे कि, vio मधे practice हाच पुढे जाण्याचा मार्ग, books वाचुन द्न्यानात भर, public ला भेटुन समाजाशी नाते टिकवणे वगैरे, एकुण सगळे उत्तम :D.
तो: अगं पण आळशी, असंच जर पुढची १० वर्षं केलं तर जिथे पोचशील तेव्हढंच पोचणं sufficient आहे का तुला? किंवा rather कुठे पोचायचंय याचा विचार तरी केला आहेस का?
मी: काय direct लाजच काढतोस तु!! ofcourse विचार केलाय मी..
तो: मग कुठे जाणार आहेस? where are you going toad?
मी: violin मधे straight forward goal आहे, decent performance देता आला पाहिजे. आता decent चं definition मला ते शिकण्याच्या process मधेच सापडेल.
तो: मान्य.
मी: आणि बाकी खरं सांगायचं तर i am a little confused. i cant find a model that will give me a good idea about the world. म्हणजे मी काही एक model तयार केलंय पण त्यात खूप loose ends आहेत.
तो: असं model असायची गरज आहेच का?
मी: असंच काही नाही, नसेल तरी जगता येऊ शकेल but then i wouldnt know where i am going.
तो: बरोबर. मग?
मी: हो म्हणुन तर i am trying to find out more, reading is one way, interacting with people is another. next will be travelling. lets see कसं जमतंय ते
तो: हे कधी जमवणार आहेस मग सगळं ?
मी: by and by, by and by :D
तो: really? is the time enough?
मी: it may not be :(. i remember the time when i graduated, i felt great that i can choose to do anything i want to and go ahead and do it. life seemed terribly good...
तो: its not good now ??
मी: it is it is. फक्त आता तु म्हणतोस तसा time चा concern add झालाय इतकंच.
तो: का? what has changed? हां तु म्हातारी वगैरे झालियेस एव्हढं सोडल्यास hehee
मी: गप रे जाड्या! तसं नाहीये ते. may be काय करायचं आहे त्या गोष्टींबद्दल जास्त clarity आल्या मुळे असेल. असं लक्षात येतंय कि खूप गोष्टी आहेत ज्या केल्या पहिजेत आणि त्या superlatively करायच्या झाल्या तर एक जन्म पुरणार नाहिये :(
तो: hm i understand.
मी: is it bad or good?
तो: bad/good असं नसतं ते, तुला accept करावं लागेल की सगळ्या गोष्टी करता येणं शक्य नाहिये. म्हणजे मरताना तुला वाटणार आहेच, हे करायचं राहिलं आणि ते करायचं राहिलं. पण काही high priorityच्या गोष्टी satisfactorily केल्यास तर कदाचित that could be a good defense against not being able to do the other things, हे एक. किंवा best thing would be to find the abstractions right..
मी: म्हणजे काय??? मला काहीच झेपत नाहिये.
तो: म्हणजे तु म्हणालीस तेच. forming the correct model of the world. जर त्या model च्या key गोष्टी कळल्या, म्हणजे what is absolutely correct and what is absolutely wrong, तर मग प्रश्न सुटेल. त्या level चं understanding आलं तर मग तुला petty गोष्टींबद्दल खंत वाटणार नाही. म्हणजे like synthesizer शिकायचाच राहुन गेला आणि EM code करायचाच राहिला अशा गोष्टींबद्दल काही वाटणार नाही. you will have found out the abstraction of syntesizer -> music and the abstraction of coding EM -> science आणि most probably असं लक्षात येइल कि ते दोन्ही एकच गोष्ट आहे..so दोन्हीपैकी एक गोष्ट केली तरी चालणार आहे किंवा दोन्ही न करुन तिसरीच म्हणजे say violin शिकणं केलं तरी चालेल...
मी: कित्ती भारी बोलतोस रे तु!! तु महान आहेस एकदम!!!
तो: म्हणजे तुला काहीच कळलं नाही ??? चिडचिड!
मी: heheee थोडं कळलं की. तु म्हणतो आहेस synth = EM = violin = books = anything. this seems like the model start of the universe. everything was condensed in a small point of immense density. so thats what it is, everything is an extrapolation of that begininng so everything = everything!
तो: i hate my life so much !@#@$#%
मी: hahhaaa haa :p
By choice
तो : काय चाललं आहे? whats new?
मी : movie पाहिला.
तो : कुठला?
मी : स्वदेस. पाहिला आहेस? काय मत?
तो : पाहिलाय कि. चांगला आहे. तुला कसा वाटला?
मी : मला आवडला. nice one. पण काय रे तुला त्या heroine चं character आवडलं कि hero चं?
तो : ofcourse heroine चं :D
मी : तसं नाही रे गाढवा, म्हणजे दोघंही काहितरी लोकोत्तर करत असतात. म्हणजे hero पल्याड सोडून इकडे येतो आणि काय-काय देशासाठी करायला लागतो. तर heroine has already been staying in the countryside and working with the kids. कोणाचा decision जास्त भारी वाटतो?
तो : तूच सांग.
मी : hero चा decision जास्त भारी वाटतो.
तो : का का? US वगैरे चं glamor तुलाही पडलंय का?
मी : US चं glamor नाही रे. But yes he is leaving nasa. हे भारी आहे. आधी nasa मधे असणंच खूप भारी, परत ते सोडणं हे अजुनच भारी. so हा factor आहेच. but there seems to be something else too…I am thinking about it
तो : hmm. मला सांग how does the heroine decide to teach in the school?
मी: तिच्या आई-वडीलांनी सुरु केलेली शाळा असते. her parents pass away in an accident. she has just completed college education, she decides to come back and run the school herself.
तो : did she have a good alternative for this?
मी : right, it was the obvious option made available by the circumstances.
तो : precisely. पण hero चं तसं नव्हतं. His decision is completely his choice. Circumstancial pressures don't play a role here. म्हणजे circumstances had given him a few options. He generated the new option of coming back and working for the country. आणि म्हणुन त्याचा decision त्याच्या thought process मधुनच निर्माण झाला आहे असं म्हणता येईल.
मी : हो असं म्हणता येईल.
तो : आणि म्हणुनच शेवटी गळ्यात गहीवर आणि डोळ्यात पाणी येऊन तुका म्हणे "hero चा decision जास्त भारी वाटतो. हरीssss विठ्ठल"
मी : hheehe. पण बुआ, भक्ताला एक शंका आहे ... जर heroineनी fight मारून आणि GRE वगैरे देऊन MS करायचे ठरवले असते तर ते भारी असले असते का?
तो : to some extent yes. to some extent कारण नुस्ता option निर्माण करणं हाच काही भारीपणा चा criterion नाही होउ शकत. याला एका sound value system चा support आणि maturity ही लागते. It would definitely have been interesting if the heroine did go for MS. पण तिचा या प्रुथ्वीतलावरचा performance impressive झाला असता जर MS करता करता तिला असं realize झालं असतं की she really wants to do something for her country. म्हणजे जर हा decision conscious thought मधुन आला असता तर.
मी : हो म्हणजे आता जेव्हा ती college नंतर लगेच शाळेत शिकवण्याचा decision घेते, she doesn't seem to have put heavy thought in it. It's the convenient choice and also a virtuous one at that.
तो : now you got it पण on a second thought त्याच्या decision मधे circumstances चा काहीच role नाही हे completely बरोबर नाही, heroine वाट बघते आहे, यापेक्शा जास्त critical circumstance कुठुन आणनार तु? :D
मी : हाड्तुड, कुत्र्याचे शेपुट वाकडे ते वाकडेच. :P
उगाच भारी
तो: मी त्याला विचारलं, "तू आणि स्म्रुति लग्न का नाही करत?"
मी: मग तो काय म्हणाला?
तो: तो विकट हसला.
मी: छ्या, विकट, बिकट हसण्याला काही अर्थ नाही, ते फ़क्त एक
tool आहे, मी भारी आहे अस दुसर्याला वाटवून देण्यासाठी.
तो: hehe शक्य आहे.
मी: अशी य tools आहेत, जी आपणही वापरतो रोजच.
तो: हो, like सगळ्याच बाबतित आपण
equally careless आहोत असे भासवणे...
मी: म्हणजे जेवणात आमरस आहे अशी हवा आधी निर्माण करुन शिकरण आलं तरी काही फ़रक पडत नाही असे दाखवणे.
तो: बरोबर, खरी टेस्ट जर, शिकरण ही न येता कारल्याची भाजी आली तर होवू शकेल :D
तो: hehe किंवा हे ऐक, कुणी काहि प्रश्न विचारला की मंद स्मित करुन "ते तुला आत्ता नाही कळणार " असं patronizing tone मधे म्हणने.
मी: haha हो, समोरचा आपल्याच वयाचा किंवा आपल्यापेक्शा मोठा असेल तर हे वाक्य फ़ारच effective होतं.
तो: किंवा, heated discussion च्या मधेच भलतेच मुद्दे, तेच मुद्दे मुळ असुन बाकी सगळा tp आहे असा आव आणुन मांडणे.
मी: उदाहरणार्थ...?
तो: हं मंदार चं उदाहरण घे, say बंड्या आणि रंगी जोर जोरात भांडताहेत say...coffee चांगली की चहा यावरुन, it goes like this…
बंड्या : (आवेषात) मी सांगतो pl मधे रात्री टम्पास भरुन प्यायलेल्या चहा मुळे माझा engg graphics चा विषय सुटला आणि...
मंदार : coffee किंवा चहा आपली basic survival need नाहीच. (pause आणि शून्यात नज़र.... )
बंड्या: (याला ignore करुन पुढे) आणि नुस्तं crisis च्या वेळेलाच नाहीतर njoyment साठी सुद्धा, ते भरत समोरचं अम्रुततुल्य, तिथला बारा बारा कप प्यायलेला चहा, अहहहा सुख सुख म्हण्तात ते हेच.
रंगी: छे coffee जास्त सही, coffe ला एक भारी status आहे :D, सगळीकडे coffee shops आली आहेत, tea shop मात्र दिसत नाही, आता बोल!
बंड्या: छ्या, त्यानी काय होणार...मी म्हणतो..
अंदार: status वरुन गोष्ट चांगली कि वाईट हे ठरणार कि quality वरुन status? मला वाटतं हे लोकांचं नेहमीचच confusion आहे. theoretical level ला solution सापडतं पण ते convinience साठी नाकारुन, practicalityच्या चौकटीत अडकतात पण स्वतःला free असल्याचं भसवतात. याच्यापेक्शा metaphysical level ला confused असणंच चांगलं...( ०.००१ मधे बघतो)
बंड्या आणि रंगी: (अवाक, ही बडबड ऐकून याला ignore करण्याइतकीही शुद्ध मेन्दूत उरत नाही)
मंदार: (बंड्या आणि रंगी ला ignore करुन) statistically majority लोकांचा हाच गोंधळ उडतो म्हणजे योग्य गोष्ट (म्हणजे त्यांना conventionally योग्य वाटणारी) केली तर ते system च्या चौकटीत बसतात पण त्यांना चौकटीच्या बाहेर विचार करता येत नसल्यामुळे आपण चौकटीत आहोत कि नाही हेच कळत नाही, in fact ती चौकट गोल तर नाही ना असाही प्रश्न पडतो..(आता ०.७ )
रंगी: पण coffeee...
मंदार: हो coffee चालेल, तेही एक metaphorच आहे म्हणा, relaxationचं illusion वाटावं म्हणुन confused माणसांनी निर्माण केलेलं.
बंड्या: (triumphantly) पण चहाचं असं नाही, तो individual आहे.
मंदार: individual कळायला तुला आधी collective कळावं लागेल.
बंड्या, रंगी: (चाचरत) collective कुठून आलं यात...?
मंदार: (विकट हसतो) (उठतो आणी बरोबर १.२३ मधल्या जब्रेश्वर अम्रुततुल्यात ४ कप चहा ढोसून येतो)
तो: आता सांग, हे काय होतं?
मी: Douglas Adams says "There's a theory which states that if at any time anyone discovers exactly what the Universe is for and why it is here, it will instantly disappear and be replaced by something even more bizarre and inexplicable."
तो: आता याचा काय अर्थ? मला इन्ग्रजी बिल्कुल कळत नाही हे तुला महितेय.
मी: (मंद स्मित) ते तुला कळेल योग्य वेळ आली कि (विकट विकट हास्य)
तो: ##$%^